प्रा. क्षितिज पाटुकले
प्रवास... ज्ञात क्षितिजाकडून... अज्ञात क्षितिजाकडे...
नमस्कार, मी क्षितिज पाटुकले
“जीवन हा सतत शिकण्याचा प्रवास आहे, प्रयत्न हाच परमेश्वर, निस्वार्थ हाच खरा स्वार्थ आणि जीवनाचा विनम्र उपासक” अशी भुमिका घेऊन जगणारे बहुआयामी आणि बहूपेढी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. क्षितिज पाटुकले.
लेखक, व्याख्याता, शिक्षणतज्ञ, उद्योजक, चिंतक, साधक, देशभक्त, गोभक्त, कृतिशिल कार्यकर्ता इ. विविध प्रकारे ते कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी जवळचे कुरुंदवाड हे आहे. त्यांचे लहाणपण कोकणामध्ये दापोली जि. रत्नागिरी येथे व्यतित झाले.
इंश्युरन्स अॅकॅडमी या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, एम.एम.एस., एल.एल.बी., फेलो
ऑफ इंश्युरन्स इंन्स्टीट्युट, पीएचडी स्कॉलर, योग आणि आयुर्वेदीक पदविका, जी.डी.सी. ए. राष्ट्रभाषा पंडित, इंडॉलॉजी इ. अनेक विषयांमध्ये त्यांनी शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या आहेत. भारतातील विविध विद्यापीठांसाठी अभ्यासक्रम तयार केले आहेत. विविध प्रकारच्या शैक्षणिक, उद्योजकीय आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे.
प्राचीन भारतीय हिंदू ज्ञान विज्ञान परंपरांमध्ये त्यांना विशेष रुची असून ते प्रखर गोभक्त आहेत. त्यांना अध्यात्मिक आणि धार्मिक चिंतनाची लहानपणापासून आवड आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून विवेकानंद केंद्राच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे लहानपणापासून आकर्षण आहे. जेष्ठ वेदांताचार्य प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचे ते अनुग्रहीत शिष्य असून ब्रह्मलिन प. पू. नारायणकाका ढेकणेयांची विशेष कृपा आहे.
प्रत्यक्ष जीवनामध्ये “ प्रत्येक क्षणावर भगवंताचे अधिराज्य ” असा त्यांचा दृढ विश्वास आणि अनुभव आहे.
आपल्या देशावर, देशाच्या उज्ज्वल इतिहास आणि परंपरांवर, धर्म आणि संस्कृतीवर आणि देश बांधवांवर ज्याचे जिवापाड प्रेम आहे असा जीवनाचा एक विनम्र विद्यार्थी अशी त्यांची स्वत:विषयक भूमिका आहे.
* संस्थापक - साहित्य सेतू
* संचालक – इंन्श्युरन्स अॅकॅडमी * अध्यक्ष - कर्दळीवन सेवा संघ
अर्थशास्त्र, विमा, पेन्शन, बॅंकीग, साहित्य व्यवहार, सोशल मेडिया, पंचकोषात्मक योग, व्यवस्थापन, प्राचिन भारतीय ज्ञान विज्ञान, वैदिक सायन्स, भारतीय गोवंश इ. क्षेत्रात कार्यरत.
ईमेल : mail@kshitijuvach.com वेबसाईट : www.kshitijuvach.com
‘ साहित्य ’ क्षेत्रातील उपक्रम -
साहित्य सेतू – Pl visit www.sahityasetu.org
१) ’ एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडणारी अभिनव साहित्य चळवळ – साहित्य सेतू ’ या संस्थेची स्थापना – संस्थापक
२) लेखकांसाठी, वाचकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळा – उदा. लेखन कसे करावे, कॉपीराईटस, लेखक – प्रकाशक करार, लेखक आणि तंत्रज्ञान, सोशल मिडिया, अनुवाद, प्रकाशन आणि पुस्तक छ्पाई, साहित्य रसग्रहण, ब्लॉग लेखन, इ-बुक्स, इ.
३) महाराष्ट्र साहित्य परिषदेची वेबसाईट आणि सोशल मिडियाची नि:शुल्क निर्मिती
४) पाच हजारांहून अधिक लेखक, प्रकाशक, साहित्यिक, चित्रकार यांची माहिती मसापच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देत आहे.
५) लेखकांच्या वेबसाईट्स बनविणे
६) पुस्तक प्रकाशनासाठी मार्गदर्शन आणि सहाय्य
७) साहित्य संमेलनांसाठी सोशल मिडियातून प्रचार आणि प्रसार
८) अनेक नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम
९) मराठीमध्ये लेखकांच्या मुलाखती रेकॉर्ड करून सोशल मिडियातून लाखो वाचकांपर्यंत पोहोचविणे
आजपर्यंत एकूण १२ पुस्तके प्रकाशित
-
कर्दळीवन: एक अनुभूती – हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, संस्कृत, तेलगू, तमिळ भाषेत अनुवादित. तसेच ब्रेल लिपी, ई-बुक, मोबाईल बुक आणि ऑडिओ बुक प्रकाशित.
-
विम्याविषयी सर्व काही - मराठी , हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती भाषेत अनुवादीत
-
तरुणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग - मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवादीत
-
मेडिक्लेम आणि हेल्थ इंन्शुरन्स - मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवादीत
-
वैद्यकीय मदत कशी मिळवावी - मराठी
-
श्री दत्त परिक्रमा - मराठी
-
कर्दळीवन संजीवनी (संपादित) - मराठी
-
पेन्शन आता प्रत्येकाला - मराठी
-
उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा - मराठी
-
नक्षत्रवृक्ष : उपासनेतून पर्यावरण संतूलनाकडे - मराठी
11. स्वर्गारोहिणी - मराठी
12. कन्यागत महापर्वकाल - मराठी
पहिले पुस्तक – विम्याविषयी सर्व काही – गणेश चतुर्थी, सप्टेंबर २००८
बारावे पुस्तक – कन्यागत महापर्वकाल – १९ जून २०१६
-
कर्दळीवन : एक अनुभूती पुस्तक – मराठी + ७ भाषांमध्ये अनुवादीत तसेच ई बुक, ब्रेल लिपी, ऑडीओ बुक म्हणून प्रकाशित
-
विम्याविषयी सर्वकाही – मराठी + ४ भाषांमध्ये अनुवादीत
-
तरूणपणीच करा रिटायरमेंट प्लॅनिंग - मराठी + ३ भाषांमध्ये अनुवादीत
-
४ पुस्तके – मराठी + २ भाषांमध्ये अनुवादीत
आतापर्यंत एकूण २ लाख २४ हजाराहून अधिक पुस्तकांची विक्री
-
४ पुस्तके अर्थ विषयक
-
६ पुस्तके अध्यात्मिक आणि धार्मिक
-
१ पुस्तक सामाजिक सहाय्य
-
१ पुस्तक निसर्ग आणि पर्यावरण विषयक