top of page

प्रा. क्षितिज पाटुकले - स्वत:विषयी 

“जीवन हा सतत शिकण्याचा प्रवास आहे, प्रयत्न हाच परमेश्वर, नि:स्वार्थ हाच खरा स्वार्थ आणि जीवनाचा विनम्र उपासक”    अशी भुमिका घेऊन जगणारे बहुआयामी आणि बहूपेढी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. क्षितिज पाटुकले.

 

 भारतविद्या (IKS) तज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, वक्ता, प्रशिक्षक, संशोधक, अभ्यासक्रम - विचारसामग्री निर्माता, साहसी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता, व्यावसायिक,प्रवासी, ट्रेकर- माऊंटेनिअर, डिजिटल माध्यम निर्माता, सल्लागार, गो - सेवक, कृतिशील कार्यकर्ता इ. विविध प्रकारे ते कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी जवळचे कुरुंदवाड हे आहे. त्यांचे लहाणपण कोकणामध्ये दापोली जि. रत्नागिरी येथे व्यतित झाले. 

भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, एम.एम.एस., एल.एल.बी., फेलो  ऑफ इंश्युरन्स इंन्स्टीट्युट, योग आणि आयुर्वेदीक पदविका, जी.डी.सी. ए. राष्ट्रभाषा पंडित, इंडॉलॉजी इ. अनेक विषयांमध्ये त्यांनी शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या आहेत.  भारतातील विविध विद्यापीठांसाठी अभ्यासक्रम तयार केले आहेत. विविध प्रकारच्या शैक्षणिक, उद्योजकीय आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे.

प्राचीन भारतीय हिंदू ज्ञान विज्ञान परंपरांमध्ये त्यांना विशेष रुची असून ते प्रखर गोभक्त आहेत. त्यांना अध्यात्मिक आणि धार्मिक चिंतनाची लहानपणापासून आवड आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून विवेकानंद केंद्राच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. श्रीरामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे लहानपणापासून आकर्षण आहे. जेष्ठ वेदांताचार्य प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचे ते अनुग्रहीत शिष्य असून ब्रह्मलिन प. पू. नारायणकाका ढेकणे यांची विशेष कृपा आहे. 

प्रत्यक्ष जीवनामध्ये “ प्रत्येक क्षणावर भगवंताचे अधिराज्य ” असा त्यांचा दृढ विश्वास आणि अनुभव आहे. 

आपल्या देशावर, देशाच्या उज्ज्वल इतिहास आणि परंपरांवर, धर्म आणि संस्कृतीवर आणि देश बांधवांवर ज्याचे जिवापाड प्रेम आहे असा जीवनाचा एक विनम्र विद्यार्थी अशी त्यांची स्वत:विषयक भूमिका आहे.   

जीवन विषयक वैयक्तिक धारणा

प्रत्येक कृतीमध्ये  भगवंताचे अधिष्ठान आहे. आपण त्याचे होऊन राहीले पाहीजे. त्यातच सर्व प्रकारचा आनंद, सुख आणि मुक्ती आहे. प्रत्येक क्षणावर भगवंताचे अधिराज्य आहे. त्याच्याच इच्छेने प्रत्येक गोष्ट घडत असते. आपण केवळ निमित्तमात्र आहोत. तो त्याचे कार्य त्याला हवे तसे आपल्याकडून करवून घेत आहे. तो आनंदात आहे. त्यामुळे मीही आनंदात आहे. समष्टीच्या हितातच आपले हित आहे. निस्वार्थ हाच सगळ्यात मोठा स्वार्थ आहे. शिवभावे जीव सेवा हेच जीवनाचे सूत्र आहे.

जीवनावर सर्वाधिक प्रभाव (व्यक्ती)

  1. सद्गुरू डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख  उर्फ डॉक्टर काका

  2. छत्रपती शिवाजी महाराज 

  3. रामकृष्ण परमहंस – शारदा माता --  स्वामी विवेकानंद

  4. प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले 

  5. प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार

  6. प.पू. गुरूजी – माधव सखाराम गोळवलकर

  7. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

  8. नेताजी सुभाषचंद्र बोस

  9. ​योगी अरविंद घोष - माताजी 

  10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  11. पंडित दिनदयाल उपाध्याय

  12. स्वामी विज्ञानानंद, मनशक्ती केंद्र, लोणावळे

  13. डॉ. नागेंद्रजी आणि डॉ. नागरत्ना दीदी  

  14. मुरलीधर नारायण ( एम. एन. ) चयनी, माजी अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज 

  15. मा. सुश्री. इंदुमती काटदरे- पुनरूत्थान विद्यापीठ

  16. श्री. दिलीप कुलकर्णी, कुडावळे, ता. दापोली, जि – रत्नागिरी

  17. प्राचार्य प्रमोदजी डोरले, मलकापूर बुलढाणा

आध्यात्मिक जीवन

१) सद्गुरू कृपा - डॉ. श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, मुरगूड ता. कागल जि. कोल्हापूर.

२) प.पू. ब्रह्मलीन नारायणकाका ढेकणे महाराज

३) प.पू.मंदाताई गंधे, अमरावती 

४) प.पू. आचार्य गोविंददेवगिरि महाराज

५) प. पू. स्वामी परमात्मानंद महाराज

६) प.पू.सद्गुरुदास महाराज ( विजयराव देशमुख )

७) प.पू. शरदशास्त्री जोशी महाराज

८) प.पू. प्रतापे महाराज

९) प.पू. बाबामहाराज तराणेकर 

१०) ब्रह्मलीन विजयराव गोखलेकाका

११) प.पू. गजानन तीर्थ स्वामी महाराज

१२) प. पू. योगिनीताई ताडे

१३) प.पू. ज्ञानराज माणिक प्रभू महाराज

१४) प. पू. जोशीकाका ( दीपक जोशी ) 

१५) प. पू. भागवत ऋषि महाराज

१६) पू. मदन महाराज गोसावी

१७) पू. योगेशबूवा रामदासी, सज्जनगड  

छंद आणि आवड

वाचन, प्रवास, ट्रेकींग माऊंटेनिअरींग, संगीत, चित्रपट आणि नाटके, गप्पा मारणे, किर्तन, प्रवचने, प्राचिन भारतीय खेळ, क्रिकेट, कब्बडी, निसर्गात फिरणे, इत्यादि 

वैयक्तिक माहिती

जन्म -: कोल्हापूर

शिक्षण -: १) प्राथामिक -: जि.प. मुलांची शाळा, दापोली जि- रत्नागिरी.

        २) हायस्कूल -: ए. जी. हायस्कूल दापोली जि- रत्नागिरी.

        ३) हायस्कूल -:  न्यू हायस्कूल शिवाजी पेठ, कोल्हापूर.

        ४) महाविद्यालय -: वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, सांगली.

        ५) सायबर- छ. शाहू इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोल्हापूर

        ६) आय.एम.एस.एस.आर. पुणे विद्यापीठ, पुणे.

        ७) शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर

        ८) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे.

        ९) स्वामी विवेकानंद योग अनुसंधान केंद्र (सव्यासा) - प्रशांति कुटीरम बंगलोर.

       १०) ज्ञानप्रबोधिनी पुणे.

       ११) मल्टिव्हर्सिटी पुणे.

       १२) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

       १३) पुनरूत्थान विद्यापीठ

      १४) पत्राद्वारे दासबोध अभ्यास – सज्जनगड.

      १५) राष्ट्रभाषा पंडीत, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा इ.

शैक्षणिक पात्रता

  1. इंजिनिअरींग डिप्लोमा इन इंड्स्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स (DIE)

  2. पोष्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (DBM)

  3. एम.एम.एस (MMS)

  4. एल.एल.बी (स्पेशल) LLB(spl)

  5. एम.ए (इंडॉलॉजी)

  6. Indian knowledge system

  7. Fellow - Insurance Institute of India

  8. आयुर्वेदिक पदविका

  9. नॅचरोपॅथी पदविका

  10. पोष्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट

  11. योग इंस्ट्रक्टर थेरपी कोर्स + योग प्रशिक्षक

  12. राष्ट्रभाषा पंडीत

  13. दासबोध प्रबोध

  14. सूत्रसंचालन प्रमाणपत्र

  15. स्टुडंट – अ‍ॅक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडीया

  16. उद्योजकता विकास कार्यक्रम

  17. जी.डी.सी.अँड.ए

  18. डिप्लोमा इन लेबर लॉज

  19. अ‍ॅम्फी - असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड 

  20. लेखन कौशल्य विकास

  21. निसर्गायण शिबिर

  22. प्रज्ञावर्धन - पुनरूत्थान विद्यापीठ

  23. वक्तृत्वकला प्रशिक्षण वर्ग

  24. लायसन्स – इंश्युरन्स सर्व्हेअर आणि लॉस असेसर

  25. लायसन्स – इंश्युरन्स एजंट

संस्था सभासदत्त्व

पेट्रन ​

  1.  भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इंस्टीट्यूट - BORI

  2.  वेदीक संशोधन मंडळ 

सभासद 

  1. International Center For Cultural Studies - ICCS

  2. World Association of Vedic Studies - WAVES

  3. INTACH

  4. Epigraphical Society of India

  5. Place Name Society of India

  6. रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया

  7. अखिल भारतीय साहित्य परिषद.

  8. युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडीया.

  9. Pune Management Association

  10. राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंच.

  11. विज्ञान भारती

  12. संस्कार भारती 

  13. संस्कृत भारती  

  14. भारत विकास परिषद 

  15. भारत इतिहास संशोधक मंडळ 

  16. कोकण इतिहास परिषद 

  17. Indian Red Cross Society

  18. इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियर्स 

  19. इंश्युरन्स इंस्टीट्यूट ऑफ इंडीया - फेलो.

  20. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंड्स्ट्रीज

  21. रंगायतन नाट्य चळवळ.

  22. स्वरूपवर्धिनी

  23. प. पू . टेंम्ब्ये स्वामी प्रबोधिनी

  24. ज्योतिर्विद्या परिसंस्था  

  25. वंचित विकास संस्था.

  26. ग्रंथालय भारती.

  27. महाराष्ट्र साहित्य परिषद.

  28. विदर्भ साहित्य परिषद.

  29. मराठवाडा साहित्य परिषद.

  30. मराठी विज्ञान परिषद.

  31. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना 

संबधित संस्था 

१) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ २) रामकृष्ण मठ ३) विवेकानंद केंद्र ४) सव्यासा, बंगळुरु ५) मनशक्ती केंद्र,लोणावळे. ६) पुनरूत्थान विद्यापीठ ७) महाराष्ट्र साहित्य परिषद ८) श्री वासूदेव निवास ९) शिवगड अध्यात्म केंद्र

१०) पत्राद्वारे दासबोध अभ्यास – सज्जनगड ११) कुरूंदवाड मित्र मंडळ, पुणे  १२) अखिल भारतीय साहित्य परिषद  १३) भांडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टीट्यूट १४) वेदीक संशोधन संस्था १५) वर्ल्ड असोसिएशन ऑफ वेदिक स्टडीज १६) साक्षी ट्रस्ट, बेंगळूर १७)आय. सी. सी. एस. १८) गोविज्ञान संस्थान, देवलापार, नागपुर    

bottom of page