top of page
  • Writer's pictureProf. Kshitij Patukale

स्वर्गारोहिणी ट्रेक यात्रा

बदरीनाथ मंदिरामागे ४० कि.मी. अंतरावर स्वर्गारोहिणी हे ठिकाण आहे. येथूनच पांडव स्वर्गाकडे गेले अशी श्रद्धा आहे. हाय अल्टिट्यूड असा हा ट्रेक आहे. ट्रेकच्या मार्गावर मनोवेधक ग्लेशियर्स, हिमनद्या, धबधबे, वने, कुरणे असून हिमालयाची विहंगम अनूभूती हे या ट्रेकचे खास वैशिष्ट्य आहे.


स्वर्गारोहिणी सतोपंथ हा साहसी अध्यात्मिक ट्रेक कर्दळीवन सेवा संघाने यावर्षी आयोजित केला आहे. हा ट्रेक दिल्ली ते दिल्ली असा १३ दिवसांचा असून त्यासाठी दिल्ली किंवा पुणे येथून सहभागी होता येईल. बदरीनाथ मंदिरामागे ४० कि.मी. अंतरावर स्वर्गारोहिणी हे ठिकाण आहे. येथूनच पांडव स्वर्गाकडे गेले अशी श्रद्धा आहे. हाय अल्टिट्यूड असा हा ट्रेक आहे. ट्रेकच्या मार्गावर मनोवेधक ग्लेशियर्स, हिमनद्या, धबधबे, वने, कुरणे असून हिमालयाची विहंगम अनूभूती हे या ट्रेकचे खास वैशिष्ट्य आहे. हिमालयाच्या कुशीतील सर्वात दुर्मिळ आणि तितकीच अवर्णनीय यात्रा म्हणजे कैलास मानसरोवर यात्रा. तिथे भारतातून जाण्यासाठी किमान २१ दिवस ते एक महिना इतका कालावधी लागतो. खर्चही दोन लाखाहून अधिक येतो. पासपोर्ट काढावा लागतो. चीनच्या हद्दीतून जावे लागते. चीन सरकारला कर भरावा लागतो. नेपाळमार्गे कैलास मानसरोवराला जाण्यासाठीही १५ दिवस आणि दिड लाखापर्यंत खर्च येतो. मात्र स्वर्गारोहिणीचे वैशिष्ट्य हे की कैलास मानसरोवरच्या यात्रे इतकाच किंबहुना त्याहूनही जास्त सृष्टी सौंदर्य आणि अद्भुत अनुभूती केवळ ७ दिवसांमध्ये मिळते. शिवाय कैलास मानसरोवरच्या एक तृतीयांश खर्चामध्ये स्वर्गारोहिणी परिक्रमा करता येते.

कर्दळीवन सेवा संघाने जून ते सप्टेंबर २०१६ महिन्यमध्ये असे तीन ट्रेक आयोजित केले आहेत. ट्रेकची सुरवात दिल्लीहून होणार असून पहिल्या दिवशी दिल्ली येथे दुपारी एक नंतर पोहोचायचे आहे. तेथून ऋषीकेश येथे दुसरा मुक्काम आणि तेथून जोशीमठ मार्गे बदरीनाथ येथे पोहोचायचे आहे. बदरीनाथ येथे मुक्काम करून दर्शन करून दुसर्या दिवशी स्वर्गारोहिणी ट्रेकची सुरवात होते. ट्रेकचा तपशील दिल्ली ते दिल्ली असा आहे.


· पहिला दिवस :- दिल्ली येथे हॉटेलमध्ये पोहोचणे – सकाळी ११ नंतर रात्री ११ पर्यंत

· दुसरा दिवस :- सकाळी प्रस्थान - ऋषीकेश येथे मुक्काम

· तिसरा दिवस :- सकाळी प्रस्थान - जोशीमठ येथे मुक्काम

· चौथा दिवस :- सकाळी प्रस्थान - बदरीनाथ येथे दर्शन आणि मुक्काम

· पाचवा दिवस :- बद्रीनाथ ते माता मंदिर ते लक्ष्मीवन, लक्ष्मीवन येथे मुक्काम

· सहावा दिवस :- लक्ष्मीवन ते सहस्त्र धारा ते चक्रतीर्थ, चक्रतीर्थ येथे मुक्काम

· सातवा दिवस :- चक्रतीर्थ ते सतोपंथ, सतोपंथ येथे मुक्काम

· आठवा दिवस :- सतोपंथ ते सोमकुंड ते विष्णूकुंश ते रामगुहा ते स्वर्गारोहिणी दर्शन.

पून्हा परत सतोपंथ येथे मुक्काम

· नववा दिवस :- चक्रतीर्थ येथे मुक्काम

· दहावा दिवस :- लक्ष्मीवन येथे मुक्काम

· अकरावा दिवस :- वसुधारा, भीमपूल, माणागाव, बद्रीनाथ येथे परत.

· बारावा दिवस :- सकाळी प्रस्थान – ऋषीकेश येथे मुक्काम

· तेरावा दिवस :- सकाळी प्रस्थान – दिल्ली येथे मुक्काम – परिक्रमा समाप्त

स्वर्गारोहिणी ट्रेकचा एकूण प्रवास ८१ कि.मी.चा असून त्यातील ७८ कि.मी. पायी आणि शेवटचा माणागावापसून ३ कि.मी.चा जीपने प्रवास आहे.


स्वर्गारोहिणी ट्रेकसाठी पासपोर्ट काढावा लागत नाही. काही वैद्यकिय चाचण्या करणे आवश्यक आहे. ट्रेकसाठी विशिष्ठ अर्जा बरोबर चाचण्यांचे रिपोर्ट पाठवावे लागतात. त्यानंतर ट्रेकसाठी परमिट मिळते. प्रत्येक ट्रेकरला एक ट्रेकर किट दिले जाते. त्यामध्ये स्लिपिंग बॅग, ट्रेकिंग सॅक, थर्मल विअर, कॅप आणि विंडचिटर दिले जाते. संपूर्ण ट्रेक मध्ये एक विशेष वैद्यकिय पथक आपल्या बरोबर असते. इमर्जन्सी वैद्यकिय सेवा, ऑक्सिजन सिलिंडर, हाय अल्टिट्यूड आजारांसाठी विशेष औषध योजना बरोबर असते. या ट्रेकचा अर्ज, सर्व माहिती www.kardaliwan.com/swargarohini या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच ट्रेकचा ट्रेलर पाहण्यासाठी ७०५७६१७०१८ या मोबाईलवर मेसेज पाठविल्यास आपल्याला व्हॉटस अ‍ॅपवर पाठविला जाईल.


स्वर्गारोहिणी ट्रेकच्या मार्गावर नर आणि नारायण पर्वत, नीळकंठ पर्वत, बाळकुम पर्वत लागतात. रस्त्याने जाताना कुबेर पर्वत, चौखंबा पर्वत आणि स्वर्गारोहिणी पर्वत यांच्या हिमशिखरांचे दर्शन होते. या ट्रेकमध्ये सतोपंथ, अलकापुरी, धनो आणि कुबेर हे ग्लेशियर लागतात. अलकनंदा, सरस्वती या नद्यांचे दर्शन होते. सहस्त्रधारा आणि वसुधारा हे धबधबे लागतात. लक्ष्मीवन हे वन लागते. स्वर्गारोहीणी भागिरथी आणि यमुना या दोन नद्यांना वेगळे करतो. या मार्गामध्ये कुठेही कसलीही सोय नसून मार्गावर तंबू रोवून मुक्काम केला जातो. एका वेळी जास्तीत जास्त ३० जणांच्या ग्रुपला या परिक्रमेमध्ये सहभागी होता येते. स्वर्गारोहिणी परिक्रमा करायच्या आधी परवानगी आणि ओळखपत्र घ्यावे लागते. सोबत पंधरा ते वीस भारतीय शेर्पा असतात. त्यांना या परिसराची खडान खडा माहिती असते आणि अनुभव असतो. त्यांच्या सहाय्याने आणि मार्गदर्शनाखालीच आपण ही परिक्रमा पूर्ण करतो.


स्वर्गारोहिणीचे वैशिष्ट्य हे की कैलास मानसरोवरच्या यात्रे इतकाच किंबहुना त्याहूनही जास्त सृष्टी सौंदर्य आणि अद्भुत अनुभूती देणारा ट्रेक केवळ १३ दिवसांमध्ये पुर्ण करता येतो. कैलास मानसरोवर यात्रेला किमान २१ दिवस ते एक महिना इतका कालावधी लागतो. खर्चही दीड ते दोन लाखाहून अधिक येतो. कैलास मानसरोवरच्या एक तृतीयांश खर्चामध्ये स्वर्गारोहिणी परिक्रमा करता येते. स्वर्गारोहिणी परिक्रमा श्रद्धेची आणि विश्वासाची कसोटी पाहणारी परिक्रमा आहे. हिमालयाचे अद्भुत आकर्षण प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेच. त्यातही श्रद्धावान, धार्मिक आणि भक्त मंडळींना ते अधिक आहे. पर्यटन, ट्रेकींग, जैवविविधता, पर्यावरणाचा अभ्यास, औषधी वनस्पती इ. अनेक कारणांनी सर्वांना हिमालयामध्ये परिक्रमा करावी असे वाटते. स्वर्गारोहिणी ही एक अशी आव्हानात्मक तितकीच अद्भुत अनुभूती घडवून आणणारी परिक्रमा आहे. नर नारायण नीळकंठ पर्वत असो, पांडवांचे अखेरचे परिभ्रमण असो, बद्री केदारचे आशिर्वचन असो, रावणाचे साहस असो, साहसी पर्यटन असो किंवा स्वत:च्या मुक्तीसाठी आसुसलेला भक्त असो सर्वांना स्वर्गारोहिणी खुणावते आहे आणि प्रत्येकाच्या स्वागतासाठी आतूर झालेली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. कर्दळीवन सेवा संघ, ६२२, जानकी रघूनाथ, पुलाचीवाडी, झेड ब्रिज जवळ, कोहिनूर इंस्टिट्यूट नजिक, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४ दूरध्वनी – ०२० – २५५३०३७१ / २५५३४६०१ मोबाईल – ९४०३७६७७५४ / ९८२२०२८९८१ ईमेल – swami@kardaliwan.com

234 views0 comments
bottom of page